Worli
Worli

Worli : Garbage : आदित्य ठाकरेंच्या वरळी वॉर्डमध्ये कचऱ्याचा ढीग; दुर्गंधीचं साम्राज्य, स्थानिक डॉक्टरांसह नागरिकांचा आरोप

मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचतात, ज्यामुळे दुर्गंधी पसरते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(Worli ) मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचतात, ज्यामुळे दुर्गंधी पसरते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काही ठिकाणी कचरा उचलण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया समाधानकारक नसते,त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचतात. हा कचरा कुजतो आणि दुर्गंधी निर्माण करतो. ज्यामुळे नागरिकांना आरोग्याचा त्रास होतो.

याच पार्श्वभूमीवर स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत असताना लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने रिअ‍ॅलिटी चेक केला आहे. या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये आज देखील आपल्याला कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात ढिगारा पाहायला मिळत आहे.

वरळी मधील कॅम्पाकोला रस्ता येथे रस्त्याच्या कडेला अक्षरशः तीन ते चार फुटाचा कचऱ्याचा ढिगारा आहे. जो मागील अनेक दिवसांपासून इथं पाहायला मिळत आहे. स्थानिकांनी वारंवार संताप व्यक्त करून सुद्धा हा कचरा या ठिकानाहून उचलला जात नसल्याचे या लोकशाही मराठीच्या रिअ‍ॅलिटी चेकमधून पाहायला मिळत आहे.

Summery

  • स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत असताना लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने केला रिअ‍ॅलिटी चेक

  • वरळीत तीन ते चार फुटाचा कचऱ्याचा ढिगारा

  • स्थानिकांनी वारंवार संताप व्यक्त करून सुद्धा हा कचरा उचलला जात नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com