Ghatkopar-Versova Metro
Ghatkopar-Versova Metro

Ghatkopar-Versova Metro : घाटकोपर वर्सोवा मेट्रोला आणखी 2 डबे जोडणार

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मेट्रो 1 चा निर्णय
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • घाटकोपर वर्सोवा मेट्रोला आणखी 2 डबे जोडणार

  • प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मेट्रो 1 चा निर्णय

  • डब्बे खरेदीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळताच अतिरिक्त डबे खरेदी केले जाणार

(Ghatkopar-Versova Metro) घाटकोपर वर्सोवा मेट्रोला आणखी 2 डबे जोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मेट्रो 1ने हा निर्णय घेतला आहे. मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वनने 32 अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली.

मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या 16 गाड्या धावत आहेत. या गाड्या सहा डब्यांच्या करण्यासाठी अतिरिक्त ३२ डबे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्गावर आता लवकरच चारऐवजी सहा डब्यांच्या गाड्या धावणार आहे.

त्यामुळे आता डब्बे खरेदीच्या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर लगेच अतिरिक्त डबे खरेदी केले जाणार असून काही महिन्यांत ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com