Tardeo
मुंबई
Tardeo : ताडदेव येथील एका घरात तब्बल साडे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला
ताडदेव येथील एका घरात तब्बल साडे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
(Tardeo) ताडदेव येथील एका घरात तब्बल साडे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. केअर टेकरने चोरी केल्याचा संशय असल्याची माहिती मिळत असून देविका पांचाळ (40) या जयवंत इंडस्ट्री जवळ एका बंगल्यात राहतात. त्यांच्या वडिलांना पॅरालिसिस त्रास असल्याने त्यांनी एका केअर टेकरची नेमणूक केली आहे.
हा केअरटेकर रोज सकाळी 8.30 वाजता येत असतो आणि 11 पर्यंत घरी जात असतो. 9 ऑगस्ट रोजी देविका त्यांच्या वडिलांच्या खोलीत गेल्या असता त्यांनी कपाट उघडले असून आतील सामान अस्ताव्यस्त झाल्याचे पाहिले.
त्यानंतर तपासणी केल्यानंतर सोन्याचा हार, सोनसाखळी, अंगठी , कानातले, बांगड्या असा साडेसहा लाखांचा ऐवज गायब झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला असून केअर टेकरची पार्श्वभूमी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.