Sohrabuddin Sheikh Encounter : सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sohrabuddin Sheikh Encounter) सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्ररकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. याच्याआधी तीनवेळा या प्रकरणाची सुनावणी झाली मात्र यामध्ये सीबीआय कोर्टापुढे निरूत्तर राहिल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे.मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं डिसेंबर 2018 मध्ये दिलेल्या निकालाला त्याचा भाऊ रूबाबुद्दीन शेखनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणी आज सर्व कागदपत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिलं आहेत.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाकडून साक्षीदारांच्या जबाबाची कागदपत्र उपलब्ध होऊ न शकल्याचं कारण वेळ मागण्यात आल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. 500 हून अधिक पानांचे साक्षीदारांचे जबाब असल्यानं त्याची प्रत तयार करण्यात उशिर लागत असल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली. आजच्या या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरण
एन्काऊंटर प्रकरणी आज सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयात पार पडणार सुनावणी
