Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरले, मेट्रोचे दार उघडताच...
(Mumbai Rains Aqua Line Metro) मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे सखल भागात पाणी साचल्याचे दृष्य पाहायला मिळत असून याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. विजेच्या कडकडाटासह मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे.
मुंबईत पहाटेपासुनच पावसाचा जोर कायम आहे. पुढील चार ते पाच तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना लोकांना कसरत करावी लागते आहे. रेल्वे वाहतुकीवर देखील पावसाचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील पावसाचा मेट्रो-3 प्रकल्पाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो अॅक्वालाईनच्या स्थानकात पाणी साचलं असून पहिल्याच पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलं आहे. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.