Mumbai Heavy Rainfall
Mumbai Heavy Rainfall

Mumbai Heavy Rainfall : मुंबईत मुसळधार पाऊस; लोकल ट्रेन उशिराने, रस्त्यांवर पाणी साचले

मुंबईला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

मुंबईला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी

मुंबईत मुसळधार पाऊस

लोकल ट्रेन उशिराने, रस्त्यांवर पाणी साचले

( Mumbai Heavy Rainfall ) राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आजपासून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी पहाटेपासून मुसळधार सरी कोसळत आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अंधार पसरला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट दिल्याने या भागांमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. गेल्या काही तासांपासून रायगड आणि ठाण्यात जोरदार पाऊस होत असून नवी मुंबईतही रात्रभर संततधार सुरू होती.

सततच्या पावसाचा फटका मुंबईच्या वाहतुकीला बसला आहे. लोकल ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या सरासरी 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावर पाच ते दहा मिनिटांचा विलंब होत आहे. दरम्यान, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल, फाईव्ह गार्डन आणि हिंदमाता परिसरात रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Mumbai Heavy Rainfall
Weather Update : येत्या 3 तासात 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज

रस्त्यावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. अंधेरी पश्चिम सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय सखल भागांमध्ये पाणी वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हजारो प्रवासी कामासाठी घराबाहेर पडत पडले मात्र, मुसळधार पावसामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com