Mumbai High Tide Alert : मुंबईच्या समुद्रात उंच लाटा उसळणार; 'या' कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार
(Mumbai High Tide Alert) मुंबईच्या समुद्रात उंच लाट उसळणार अूसन समुद्राला मोठी भरती येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. 24 जुलैपासून सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे.
24 ते 27 जुलै 2025 या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती मिळत आहे. भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 26 जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत.
यामध्ये 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजून 57 मिनीटांनी लाटांची उंची 4.57 मीटर असणार आहे. 25 जुलै 2025 रोजी लाटांची उंची ही 4.66 मीटर असणार आहे. 26 जुलै 2025 रोजी लाटांची उंची 4.67 मीटर असणार असून 27 जुलै 2025 रोजी 1.56 वाजता लाटांची उंची 4.60 मीटर असणार आहे.