Breaking News : महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची महत्त्वाची फाइल मंत्रालयातून गायब; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News ) महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची महत्त्वाची फाइल मंत्रालयातून गायब झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी आता अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईतील मंत्रालयातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या डॉक्युमेंटरीशी संबंधित मूळ सरकारी फाईल रहस्यमयरीत्या गायब झाली असून या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध FIR नोंदवण्यात आली आहे. 28 ऑक्टोबरला तपासादरम्यान मूळ फाइलच्या जागी केवळ फोटोकॉपी असल्याचे त्यांनी पाहिले.
DGIPR मधील वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर नामदेव कांबळे यांनी ही तक्रार दिली. तसेच यातून 2017 ते 2020 या कालावधीतील संपूर्ण नोंदी गायब असल्याचे उघड झाले. त्यानंतर 14 नोव्हेंबरला अधिकृत आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता पोलीस फाइल मंत्रालयातून कशी गायब झाली याचा तपास करत आहेत.
Summery
महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची महत्त्वाची फाइल मंत्रालयातून गायब
अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध FIR नोंदवण्यात आली
