Dadar kabutar khana
Dadar kabutar khana

Dadar kabutar khana : मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आज जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन

मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आज जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आज जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन

  • जैन समाजाकडून दादरमध्ये प्रार्थना सभेचे

  • दादरच्या योगी सभागृहात आयोजन

Dadar kabutar khana) मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आज जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरु व्हावेत ही जैन समुदायाची इच्छा असून पुन्हा एकदा यावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेडून शहरातील कबुतरखाने बंद करण्यात येत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, जैन समाजाने याला विरोध करत निदर्शने केली. त्यानंतर आता दादरच्या योगी सभागृहात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या जैन धर्मसभेत मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कबुतरखान्यांचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. सकाळी दादरमधील योगी सभागृहात सकाळी 8.30 वाजता विविध धर्मगुरू येऊन चर्चा करणार असून मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरु व्हावेत ही जैन समुदायाची इच्छा असून त्यासाठी आता जैन समाज पुन्हा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com