Jain Samaj : Kabutar Khana : कबुतरखाना संदर्भात जैन समुदयाच्या उपोषणास आजपासून सुरूवात
थोडक्यात
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे जैन समाजामध्ये नाराजी
कबुतरखाना संदर्भात जैन समुदयाच्या उपोषणास आजपासून सुरूवात
जैन मुनी निलेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर उपोषण
(Jain Samaj) मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे जैन समाजामध्ये नाराजी पसरली असून याच पार्श्वभूमीवर आता जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
कबुतरखाना संदर्भात जैन समुदयाच्या उपोषणास आजपासून सुरूवात होत आहे. आझाद मैदान या ठिकाणी जैन समुदाय उपोषण करणार असून जैन मुनी निलेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर हे उपोषण करण्यात येणार आहे.
सकाळी 8 वाजता कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा काढून मग आझाद मैदान येथे उपोषणास सुरुवात होणार आहे. याच्याआधी 1 तारखेला उपोषण करण्यात येणार होते मात्र तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
