Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला; गणेशभक्तांची मोठी गर्दी
थोडक्यात
लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला
लालबागच्या राजाला निरोप देण्याच्या आधी आरती करण्यात येईल.
बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी
(Lalbaugcha Raja Visarjan 2025) दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला. बाप्पाची सेवा केल्यानंतर काल थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले गेले. मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते.
मुंबईत देखील विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला असून थोड्याच वेळात विसर्जन होईल. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली आहे. लालबागच्या राजाला निरोप देण्याच्या आधी आरती करण्यात येईल.
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे. थोड्याच वेळात आता लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाची मुंबईत भव्य दिव्य मिरवणूक सुरु आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. मिरवणूकीत गणेशभक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे.