Mumbai Traffic : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते असणार बंद, जाणून घ्या
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Traffic) महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे जमतात. या वेळी गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. आज पासून पुढील दोन दिवस म्हणजे 7 डिसेंबर पर्यत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
वाहतुकीसाठी कोणते रस्ते बंद रस्ते ?
1)श्री सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटल पर्यंत वाहतुकीकरिता बंद
(तथापी हिंदूजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक हे एस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे जावू शकतील.)
2)एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहिल म्हणजेच सदर मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोर्तुगिज चर्च जंक्शन येथून श्री सिध्दीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल.
3)संपुर्ण रानडे रोड हा सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद राहील.
4)ञानेश्वर मंदिर रोड हा सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद राहील.
5)जांभेकर महाराज रोड हा सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद राहील.
6 )संपुर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हा वाहतूकीकरिता बंद राहील.
7)संपुर्ण एम. बी. राऊत मार्ग हा वाहतूकीकरिता बंद राहील.
8)टी. एच. कटारीया मार्ग हा एल. जे. रोडच्या शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शन पर्यंत वाहतूकीस बंद राहील.
वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनाचे पालन करणे आवश्यक असून त्यामुळे स्थानिकांना गर्दीचे मार्ग टाळता यावे यासाठी मुंबई पोलिसांकडून त्यांना पर्यायी मार्गावरून जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Summery
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे जमतात
आज पासून पुढील दोन दिवस म्हणजे 7 डिसेंबर पर्यत वाहतुकीत बदल
