Mumbai
Mumbai

Mumbai : डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला अन्...; मुंबईतील राममंदिर स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती

व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • रेल्वे स्टेशनवरच महिलेची प्रसूती

  • मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवरील प्रकार

  • व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

(Mumbai) तुम्हाला 3 इडियट्स या चित्रपटातील रँचो माहित आहे का? या चित्रपटात अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसूती वेदना होत असतात मात्र मुसळधार पावसामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसते. यावेळी रँचो आणि त्याचे मित्र त्या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत व्हिडीओ कॉलद्वारे बोलून तिची प्रसूती करतात.

अशीच काहीशी घटना मुंबईतील राम मंदिर या रेल्वे स्थानकात घडली. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री 1 वाजता एका महिलेची प्रसूती झाली आहे. या महिलेला रेल्वेने प्रवास करत असताना प्रसूती कळा सुरु झाल्या. तेव्हा एका तरुणाने यावेळी धावत्या रेल्वेची साखळी ओढून ट्रेन थांबवली. त्यानंतर त्या तरुणाने व्हिडिओ कॉलद्वारे त्या महिलेची प्रसूती केली.

एका महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवर जसे सांगितले त्याप्रमाणे त्या तरुणाने त्या महिलेची प्रसूती केली. स्टेशनवर उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याचे कौतुक केले असून या तरुणाचं नाव विकास विकास बेंद्रे आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलात व्हायरल झाला आहे. बाळ आणि आई सुखरुप असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com