Mumbai : मराठी शाळांच्या मुद्यावर 'या' तारखेला मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) मराठी शाळांच्या मुद्यावर मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 18 डिसेंबरला मराठी शाळांच्या मुद्यावर मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे.
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी ही घोषणा केली आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या परिषदेत मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना शोधण्यासाठी आणि वस्तुस्थितीबाबत चर्चा झाली.
मराठी शाळांचे भूखंड स्वस्त दरात घेऊन, बिल्डरांना देऊन त्या जागांवर मॉल-टॉवर उभारण्याचा धंदा महाराष्ट्रात सुरू असल्याचा दीपक पवार यांनी आरोप केला आहे.
Summery
मराठी शाळांच्या मुद्यावर १८ डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा
मराठी शाळांच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्राचा कृतिशील कार्यक्रम
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची घोषणा
