Navi Mumbai : नवी मुंबईत वाशीमध्ये इमारतीला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 14 मध्ये आग
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • नवी मुंबईत वाशीमध्ये इमारतीला भीषण आग

  • नवी मुंबईतील वाशी सेक्टर 14 मध्ये आग

  • आगीत 4 जणांचा मृत्यू तर, 10 जण जखमी

(Navi Mumbai) नवी मुंबईत वाशीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 14 मध्ये इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली असून ती आग 11 व 12 व्या मजल्यापर्यंत पोहोचली. मृत्यू झालेल्या माणसांमध्ये 6 वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com