Mumbai Local Mega Block : मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा...!
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Local Mega Block ) मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल असणार आहेत. विविध अभियांत्रिकी, देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग माटुंगा - मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.5 ते दुपारी 3.45 पर्यंत ब्लॉक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत गोरेगाव, बोरिवलीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ठाणे – वाशी / नेरुळ / पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर मार्ग ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल.
Summery
रविवारी मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
विविध अभियांत्रिकी, देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक
