Mumbai : खाट, अंथरुण...; सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या पुरुषांनी थाटला संसार, रे रोड परिसरातील धक्कादायक प्रकार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) मुंबई महापालिका शौचालयांमध्ये अनेकदा अस्वच्छता आणि अपुऱ्या सोयीसुविधा पाहायला मिळतात. असे असताना आता एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. रे रोड परिसरात महिलांच्या शौचालयातच अनधिकृत रित्या संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खाट, अंथरुन असे सर्व सामान त्या महिला शौचालयात पुरुषांचा वावर होताना पाहायला मिळत आहे. महिलांच्या शौचालयाच्या दरवाजाच्या समोरच बेड टाकून पुरुष झोपलेला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी रात्री शौचालयातच बसून मद्यपान केले जाते असल्याची माहिती मिळत आहे.
महिलांना रात्री अपरात्री महिलांना शौचालयास जायचे असते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असून येथे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीवर, महिलेवर अतिप्रसंग झाला तर याला जबाबदार कोण ? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
Summery
सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या थाटला संसार
महिला शौचालयात पुरुषांचा वावर
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित
