Chhath Puja : 'या' तारखेला मेट्रो आणि बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार
थोडक्यात
छठ पूजा 27 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान असणार
छठ पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पार पडली बैठक
मेट्रो आणि बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार
(Chhath Puja ) छठ पूजा 27 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. मुंबईत छठ पूजेसाठी 40 ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
सर्व पूजा स्थळावर चोख पोलीस बंदोबस्त तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांनी छठ पूजेसाठी अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. मुंबई परिसरात छट पूजेसाठी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
अशा वेळी काही अनुचित घटना होऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. छठ पूजा करण्यासाठी काही जागांवर परवानगी घ्यावी लागते आणि यासाठी एक खिडकी योजना सुरू करून ही योजना पुढील पाच वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. शिवाय काही छठ पूजा मंडळांना नवीन पूजा स्थळांची परवानगी हवी असल्यास तत्काळ ही परवानगी मिळावी, असेही निर्देश दिले आहेत.