MHADA Lottery
मुंबई
MHADA Lottery : 'या' महिन्यात निघणार म्हाडाच्या चार हजार घरांसाठी लॉटरी
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढण्यात येणार आहे.
(MHADA Lottery) म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जुलै महिन्यात सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 30 हजार घरांची लॉटरी म्हाडातर्फे दरवर्षी काढण्याचे नियोजन आहे. दिवाळीत देखील मुंबईत म्हाडाची पाच हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुमारे चार हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी कोकण मंडळाने सुरू केली आहे. चितळसर येथे उभारलेल्या 1173 घरांसह हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचादेखील यामध्ये समावेश असणार असल्याची माहिती मिळत आहे.
यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं नागरिकांचे लवकरच घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 2024मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती.