Mumbai : मुंबईत बेस्टच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; बस चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
( Mumbai ) मुंबईत बेस्टच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडाळ्याच्या पेन्सिल बस स्थानक परिसरात ही घटना घडली असून टॅक्सीच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या महिला आणि लहान मुलाला बेस्टने धडक दिली आणि यामध्ये त्यांच्या मृत्यू झाला.
इलोजियस सेल्वराज (27) , अँटोनी सेल्वराज (7) असे मृत्यू झालेल्या मायलेकाचे नाव आहे. मुसळधार पावसामुळे शाळा लवकर सोडण्यात आल्या असल्याने मुलाला आणण्यासाठी त्याची आई शाळेत गेली होती. याप्रकरणी आता बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बस चालक शिवाजी नागरपेणे ( 40) याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसचा ब्रेक नादुरुस्त असल्याने अपघात घडल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले असल्याची माहिती मिळत असून बसच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.