Mumbai BJP : मुंबई भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक समितीची घोषणा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai BJP ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची घोषणा करण्यात आली असून मंत्री आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विनोद तावडे व मंत्री मंगलप्रभात लोढांचा या समितीत समावेश आहे. ही समिती निवडणुकीचे नियोजन व प्रचार रणनिती ठरवणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुंबई भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक समितीची घोषणा
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा
मंत्री आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विनोद तावडे व मंत्री मंगलप्रभात लोढांचा समितीत समावेश
