Mahanagar Palika Election
Mahanagar Palika Election

Mahanagar Palika Election: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा येत्या 15 दिवसांत होणार

Mumbai Election 2025: मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा पुढील 15 दिवसांत होण्याची शक्यता वाढली आहे. राज्यातील निवडणूक वेळापत्रकात बदल अपेक्षित आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी एकाच दिवशी जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. यापूर्वी निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी मतदान घेऊन 3 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, काही नगरपरिषदांमध्ये मतदान प्रक्रिया न्यायालयीन वादामुळे पुढे ढकलली गेली होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकत्रितपणे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.​

Mahanagar Palika Election
Gold-Silver Rate: सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदीचे भावही नरमले; जाणून घ्या नवे दर

काल नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. यानंतर आज निकाल जाहीर होणार होते, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका झाली असून, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रमही प्रभावित झाला आहे.​

Mahanagar Palika Election
DRDO Rocket Sled Test: DRDO ची मोठी कामगिरी! DRDO चे फायटर जेट एस्केप सिस्टीम चाचणी यशस्वी

यापूर्वी निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषद-नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निश्चित केले होते. परंतु आता न्यायालयीन आदेशानंतर या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 15 ते 20 डिसेंबरदरम्यान 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com