Mumbai Cold wave
Mumbai Cold wave

Mumbai Cold Wave : मुंबईकर गारठले; दहा वर्षातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Cold Wave) राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने मुंबई गारठली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मुंबईतील थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

सांताक्रूझ येथे बुधवारी 16.2 तापमान नोंदवण्यात आले. या तापमानाने दहा वर्षातील विक्रम मोडीत काढला असून पुढील एक ते दोन दिवस तापमानातील घटता आलेख कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात किमान तापमानात एक ते चार अंश सेल्सिअसने घसरण नोंदविण्यात आली असून मुंबईत काल दहा वर्षातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद आहे.

Summery

  • उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मुंबईकर गारठले

  • मुंबईत काल दहा वर्षातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

  • पारा पोहचला १६.२ अंशांवर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com