Dharavi Firing
मुंबई
Dharavi Firing : धक्कादायक! धारावीत गोळीबार; महिला गंभीर जखमी
मुंबईच्या धारावीत महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
(Dharavi Firing) मुंबईच्या धारावीत महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धारावीच्या मुस्लिमनगरमध्ये एका महिलेवर गोळीबार झाला. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली आहे.
सर्वर बानू शेख असे या महिलेचे नाव असून रात्रीच्या सुमारास महिला घराजवळ उभी असताना तिच्या दंडावर अचानक काही तरी आघात झाल्याने महिला जखमी झाली. महिलेच्या दंडाला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.
जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शाहू नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळालेली नसून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.