Mumbai Rain Update
मुंबई
Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर; केईएम रुग्णालयात शिरले पाणी; रुग्णांचे हाल
सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
(Mumbai Rain Update ) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत असून पावसाची संततधार सुरु असून रेल्वेवर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. याच मुसळधार पावसाच्या पाण्याचा फटका केईएम रुग्णालयाला बसल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे केईएम रुग्णालयातील तळमजल्यात पाणी साचले असून पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयातील काही वॉर्ड मध्ये पाणी साचले आहे. तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल झाले आहेत.