Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा...!
(Mumbai Local Mega Block ) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध तांत्रिक, अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी 11 जानेवारी रोजी तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
घाटकोपर स्थानक येथून सकाळी10.19ते दुपारी 3.52 वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाणे - वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला असून सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असून या कालावधीत वाशी / नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पूर्णत रद्द राहतील. तर ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 04.07 वाजेपर्यंत वाशी / नेरूळ / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
यासोबतच पश्चिम रेल्वे सध्या 30 दिवसांचा ब्लॉक घेतला असून अप फास्ट रात्री 11.15 ते पहाटे 03.15 आणि डाउन फास्ट मार्गावर दुपारी 1.00 ते सायंकाळी 04.30 पर्यंत असणार आहे.
Summary
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक
देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या ब्लॉक
रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक
