Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो, रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा! तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Local Mega Block) मुंबईत तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द तर काही लोकल विलंबाने धावणार आहेत. सीएसएमटी-विद्याविहार आणि पनवेल- वाशीदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. यामुळे मेन लाईनवर मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या रेल्वे स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बरवरील लोकल रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएएसएमटी आणि वाशी स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या काळात ठाणे ते वाशी-नेरुळ तसेच बेलापूर/नेरुळ ते उरण या मार्गांवरील सेवा सुरू राहणार आहेत.
पनवेल ते टर्मिनस जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 या वेळेत सुटणाऱ्या लोकल तसेच पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील 9:45 ते 15:12 या वेळेत सुटणाऱ्या लोकल रद्द राहणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 10:48 ते 3:45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
Summary
मुंबईकरांनो, रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा!
मुंबईत तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
काही लोकल फेऱ्या रद्द, काही लोकल विलंबाने धावणार
