Mumbai Local Mega Block
Mumbai Local Mega Block

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

उद्या लोकलने प्रवास करत असाल तर वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Mumbai Local Mega Block) उद्या लोकलने प्रवास करत असाल तर वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी, देखभालीची कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून मीरा रोड आणि भाईदरदरम्यान मेट्रो-९ च्या गर्डर लॉन्चिंगसाठी तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

शनिवार, रविवार आणि सोमवारी मध्यरात्री 12:45 ते 3:15 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक घेतला जाईल. तसेच रविवारी सकाळी 10:35 ते 3:35 या कालावधीत चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान मेगाब्लॉक राहणार आहे.

यासोबतच हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल येथूनठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 पर्यंत आणि ठाण्यातून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 पर्यंत बंद राहील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com