Mumbai Local Megablock
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock : लोकलचं वेळापत्रक बघून करा प्रवास; तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी येत्या रविवारी, 3 ऑगस्ट 2025 रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Mumbai Local Megablock ) मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी येत्या रविवारी, 3 ऑगस्ट 2025 रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा.

मध्य रेल्वे (Central Railway)

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 या वेळेत मेगाब्लॉक राहील. या काळात जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यामुळे काही लोकल १५ मिनिटांपर्यंत उशिराने धावण्याची शक्यता आहे.

हार्बर रेल्वे (Harbour Line)

कुर्ला ते वाशी या दरम्यान अप-डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या काळात कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. यावेळी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्ग म्हणून ठाणे ते वाशी-नेरुळ ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रवास करता येईल.

पश्चिम रेल्वे (Western Railway)

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर 10.35 ते 3.35 या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत जलद मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून, काही लोकल फक्त बांद्रा किंवा दादरपर्यंत धावतील आणि तेथूनच परतीच्या दिशेने मार्गस्थ होतील. ब्लॉकदरम्यान सर्व जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

प्रवाशांनी रविवारी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट किंवा अ‍ॅपवर अद्ययावत वेळापत्रक पाहणे आवश्यक आहे, जेणेकरून अडचणी टाळता येतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com