Mumbai Local Megablock
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock : पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या घेण्यात येणार मेगाब्लॉक; एकूण 163 लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Mumbai Local Megablock ) पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान एकूण 163 लोकल रद्द असणार आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी दुपारी 2 ते रविवारी मध्यरात्री 1 दरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावर सुमारे 163 लोकल रद्द करण्यात येणार असून कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारच्या ब्लॉक कालावधीत एकूण 73 लोकल रद्द होणार असून रविवारी 89 लोकल रद्द करण्यात येणार आहे. या काळात मध्य रेल्वेवर मस्जिद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, या स्थानकांवर लोकल उपलब्ध होणार नाहीत

यासोबतच हार्बर मार्गावर उद्या (रविवारी) सकाळी 11:40 ते सायंकाळी 4:40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणर असून सीएसएमटी ते वडाळा रोड आणि वाशी ते बेलापूर- पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगाव या मार्गावरील सेवा सकाळी 11:16 ते सायंकाळी 4:47पर्यंत बंद राहतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com