Mumbai Local Train Block : कर्जत ते खोपोलीदरम्यान आज विशेष ब्लॉक
थोडक्यात
कर्जत ते खोपोलीदरम्यान आज विशेष ब्लॉक
CSMT वरून खोपोली ट्रेनही कर्जतपर्यंतच धावणार
कर्जत स्थानकात तांत्रिक कामासाठी ब्लॉक
Local Train Block : कर्जत ते खोपोलीदरम्यान आज विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या ब्लॉकमुळे कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे.दुपारी 12.20 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली लोकल कर्जतपर्यंत धावणार असून दुपारी 1.48 वाजता सुटणारी खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत येथून नियोजित वेळेत धावणार आहे.
भिवपुरी स्थानक – जांब्रुंग केबिन – ठाकूरवाडी – नागनाथ केबिन ते कर्जत स्थानकादरम्यान सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. कर्जत यार्डातील मोठ्या कामामधील शेवटचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.