Mumbai Metro 3
Mumbai Metro 3

Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद; पहिल्याच दिवशी दीड लाख प्रवाशांनी केला प्रवास

मेट्रोमुळे 3 तासांचा प्रवास 1 तासावर
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मुंबई मेट्रो ३ ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद

  • भूमीगत मेट्रो 3 पूर्ण क्षमतेने सुरू

  • पहिल्याच दिवशी दीड लाख प्रवाशांनी केला प्रवास

(Mumbai Metro 3 ) मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. अॅक्वा लाईनची आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशी सेवा गुरुवारपासून सुरू झाली. सकाळी 5.55 वाजता सुरू झालेली मेट्रो 3 ही रात्री 10.30 पर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई मेट्रो ३ ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. भूमीगत मेट्रो ३ पूर्ण मार्गावर सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी दीड लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे.

आरे जेव्हीएलआर ते कफ परेड दरम्यान दिवसभरात 1 लाख 56 हजार 456 प्रवाशांनी प्रवास केला असून मेट्रो ३ ने 2.30 तासाचा प्रवास 1 तासावर आल्याने अनेक प्रवाशांनी मेट्रोने जाण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

तिकीट काढण्यासाठी मोठी रांग लावली होती. गाडी पकडण्यासाठी अनेकांनी कफ परेडसह अनेक स्थानकांवर मोठी गर्दी केली होती. 'मेट्रो ३’ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार असल्याने प्रवाशांमध्ये मोठा उत्साह होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com