Municipal Corporation
Municipal Corporation

Municipal Corporation : मुंबई पालिकेने थकवले म्हाडाचे 130 कोटी रुपये

दक्षिण मुंबईत सुमारे 13 हजार उपकरप्राप्त इमारती
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पालिकेने म्हाडाचे 13 वर्षात 130 कोटी रुपये थकवले

  • पालिकेने उपकराची रक्कम म्हाडाला दिलेली नाही

  • दक्षिण मुंबईत सुमारे 13 हजार उपकरप्राप्त इमारती

Municipal Corporation) मुंबई पालिकेने म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवल्याची माहिती मिळत आहे. पालिकेने उपकराची रक्कम म्हाडाला दिलेली नाही. गेल्या तेरा वर्षापासून पालिकेने उपकराची रक्कम म्हाडाला दिलेली नसल्याचे समजते.

इमारतींमधील मालक आणि भाडेकरू यांच्याकडून महापालिका उपकर वसूल करून त्यातील 10 कोटी रुपये दरवर्षी पालिका म्हाडाला देते. मात्र 2012पासून मुंबई महानगरपालिकेने म्हाडाच्या उपकराची तब्बल 130कोटी रुपयांची रक्कम थकवल्यामुळे उपकरप्राप्त इमारतींच्या संरक्षणात्मक दुरुस्ती व पुनर्रचनेच्या कामासाठी निधीची कमतरता निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com