Mumbai Nagpur Special Train
Mumbai Nagpur Special Train

Mumbai Nagpur Special Train : मुंबई नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटूनही CSMT स्थानकात आलीच नाही; प्रवासी संतप्त

मुंबई नागपूर विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Mumbai Nagpur Special Train) मुंबई नागपूर विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, रात्री 12.20 वाजता सुटणारी ही ट्रेन सकाळी 6 वाजले तरी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर न आल्यानं प्रवासी प्रंचड संतापल्याचं पाहायला मिळाले.

मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटून ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आलीच नाही. मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटल्यानंतर देखील न आल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून चालकाशी संपर्कच होत नसल्याचे कारण दिलं जात असल्याची माहिती मिळत आहे. प्रवाश्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com