Mumbai : मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
थोडक्यात
मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत धक्कादायक घटना
विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे
(Mumbai) दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला. राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्दैवी घटना घडली.
खैराणी रोड परिसरात मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. SJ स्टुडिओसमोर खैराणी रोडवर हाय टेन्शन वायरमधून एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट विसर्जन ट्रॉलीला लागल्याने पाच जणांना विद्युत धक्का बसला. यामध्ये एकाचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमींमध्ये बिनू शिवकुमार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता, धर्मराज गुप्ता, आरुष गुप्ता , शंभू कामी आणि करण कानोजिया हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.