Mumbai Rain High Tide
Mumbai Rain High Tide

Mumbai Rain High Tide : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आजपासून सलग 5 दिवस समुद्राला येणार मोठी भरती

आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Mumbai Rain High Tide ) आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती मिळत आहे. आजपासून 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार असून मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यामध्ये सर्वाधिक उंचीच्या लाटा या 26 जून रोजी उसळणार असल्याचे सांगण्यात आले असून भरती दरम्यान साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये 19 वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे.

भरतीच्यावेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जावू नये, तसेच वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com