Mumbai Rain
मुंबई
Mumbai Rain : मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा,पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
( Mumbai Rain) मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून कामांवर जाणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झालीये.
यात पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रुज,वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास जर असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे सांगण्यात आले असून पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.