Heavy Rainfall Alert : मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजला आज सुट्टी जाहीर
(Heavy Rainfall Alert ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा
देण्यात आला असून मुंबईसह ठाणे, पालघरच्या शाळांनाही आज सुट्टी देण्यात आली आहे. यासोबतच रत्नागिरी, रायगड, तसेच कल्याण-डोंबिवली , मिरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल महापालिकेतील सर्व सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.