Mumbai Local : मुंबईला मिळणार वातानुकूलित 18 डब्यांची लोकल
थोडक्यात
मुंबईला मिळणार वातानुकूलित 18 डब्यांची लोकल
2 हजार 856 वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांची होणार खरेदी
दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा जाहीर
(Mumbai Local) मुंबईला आता वातानुकूलित 18 डब्यांची लोकल मिळणार आहे. हे. 2,856 वातानुकूलित वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदी व दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
6 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प फेज तीन व तीन ए अंतर्गत निविदा काढण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी मध्य रेल्वेवर भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवर वाणगाव अत्याधुनिक देखभाल दुरुस्ती आगरे विकसित केली जाणार आहेत. मध्य रेल्वेवर भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवर वाणगाव अत्याधुनिक देखभाल दुरुस्ती आगरे विकसित केली जाणार आहेत.
यासोबतच 15 डब्यांच्या लोकल सेवांचा व आवश्यकतेनुसार 18 डब्यांच्या लोकलचा समावेश केला जाईल. या गाड्या 12, 15 आणि 18 डब्यांच्या रचनेचे असणार असल्याची माहिती मिळत असून यामुळे प्रवासी क्षमता, सोय आणि सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.