Mumbai
Mumbai

Mumbai : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! धरणांमध्ये राहिला फक्त 'इतका' टक्के पाणीसाठा

अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे.
Published on

(Mumbai) उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांमध्ये फक्त 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. सध्या सात धरणातील पाणीसाठा १८ टक्के असला तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट अजून तरी दिसत नाही आहे.

जुलैपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन पालिकेने केले असून राज्य सरकारच्या कोट्यातूंसुद्धा पाणी उपलध्ब करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र पावसाला उशिर झाला तर मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com