Mumbai Water Metro
Mumbai Water Metro

Mumbai Water Metro : मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय; लवकरच सुरु होणार मुंबईतील वॉटर मेट्रोचे काम

मुंबईकरांना नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो मात्र आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Mumbai Water Metro ) मुंबईकरांना नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो मात्र आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प वॉटर मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

या वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यात सादर करण्यात येणार आहे. वॉटर मेट्रो सुरु करण्यासाठीचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. त्याचे प्रेझेंटेशन सोमवारी करण्यात आले. विशेषतः बांद्रा, वरळी. वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये येथे हे वॉटर मेट्रो सुरु करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वॉटर मेट्रोच्या तिकिटांचे दर ही सर्वसामान्यांना परवडतील असेच असणार आहेत. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईकडे आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी हा वॉटर मार्ग एक महत्त्वाचं वाहतूक मार्ग ठरणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

वॉटर मेट्रो रेल्वे सुरू करण्याच्या धर्तीवर मंत्रालयामध्ये एक बैठक पडली आणि त्या दृष्टीने प्रेसेंटेशन करण्यात आले. यावरती सकारात्मक चर्चा करून वॉटर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना नितेश राणे यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप कोची मेट्रो रेलचे अधिकारी याचा संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता 2026 च्या दरम्यान वॉटर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com