Mumbai Air Pollution : मुंबईची हवा ‘वाईट’ श्रेणीत; प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका
थोडक्यात
राज्यातील शहरी भागांमध्ये प्रदूषणाचा कहर
फटाक्यांची आतशबाजी केल्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम
मुंबईची हवा ‘वाईट’ श्रेणीत
(Mumbai Air Pollution) राज्यातील शहरी भागांमध्ये प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतो आहे. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके उडवले जातात. यामुळे प्रदूषण पसरते.
प्रदूषणामुळे अनेक आजार होतात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत प्रदूषणाची पातळी अतिशय धोकादायक झाली आहे. मुंबईत प्रदूषणाचा कहर पाहायला मिळत असून मुंबई जगातील दुसऱ्या सर्वाधिक प्रदूषित शहराच्या स्थानी आले आहे.
प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली असून मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले याच्या परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. मुंबईतील हवा बिघडली आहे. मुंबईची हवा गुणवत्ता ‘मध्यम’ ते ‘वाईट’ या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात आणखी बदल होऊन हवा गुणवत्ता ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेल्याची माहिती मिळत आहे.
