Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण; दोन जणांवर गुन्हा दाखल, अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
थोडक्यात
मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आला
आज होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आला . ९ जून २०२५ रोजी झालेल्या मुंबई लोकल रेल्वे अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला होता. या रेल्वे अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर ९ लोक जखमी झाले होते.
याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात सहायक विभाग अभियंता विशाल डोलस आणि वरिष्ठ विभाग अभियंता समर यादव यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
ठाणे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार असून या सुनावणीत काय निर्णय होते याकडे लक्ष आहे.
