Navi Mumbai Airport : तारीख ठरली! 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळ प्रवासी सेवेसाठी सज्ज

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या 25 डिसेंबरपासून प्रवासी सेवेसाठी सज्ज होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai Airport) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या 25 डिसेंबरपासून प्रवासी सेवेसाठी सज्ज होणार आहे. पहिल्या काही महिन्यांत प्रवाशांना दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गोवा, लखनौ, नागपूर, अहमदाबाद यांसह 16 प्रमुख शहरांचा प्रवास करता येणार आहे. पहिली आगमन करणारी फ्लाइट असेल इंडिगोची बेंगळुरू–मुंबई सेवा, तर पहिली प्रस्थान फ्लाइट असेल इंडिगोची मुंबई–हैदराबाद, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर देखील पहिल्या टप्प्यातच ऑपरेशन्स सुरू करतील.

काही विमानांची उड्डाणे दररोज असतील तर काही फ्लाइट्स विशिष्ट दिवशीच सुरु राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई विमानतळावरून अकासा एअर दिल्ली तसेच गोवा, कोची आणि अहमदाबाद या चार शहरांसाठी थेट उड्डाणे देणार आहे. काही शहरांसाठी सुरुवातीला उड्डाणे सुरू होतील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय वाहतूक देखील सुरू केली जाईल. अशी माहिती मिळत आहे.

या विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबरला झाले होते. आता तिकीट बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे, तर 25 डिसेंबर रोजी पहिली व्यावसायिक फ्लाईट उड्डाण करेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Summery

  • नवी मुंबई विमानतळ टेक-ऑफ साठी सज्ज

  • 25 डिसेंबरला विमानतळ सुरु होणार

  • मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com