Navi Mumbai Metro
Navi Mumbai Metro

Navi Mumbai Metro : नवी मुंबईत नवी मेट्रो लाईन! विमानतळासह 11 स्थानकांना मिळणार थेट जोडणी

नवी मुंबईसाठी आता आणखी एक मेट्रो धावणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai Metro) नवी मुंबईसाठी आता आणखी एक मेट्रो धावणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी विमानतळासह 11 स्थानकांना जोडणी करण्यात येणार असून शहराच्या अंतर्गत भागात ही मेट्रो धावणार आहे.

राज्य सरकारकडून मंजुरीनंतर मेट्रो लाईन 8 चा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई विमानतळाशी जोडण्यासाठी राज्य सरकारने सिडकोसोबत मिळून मेट्रो लाईन उभारण्याचा हा निर्णय घेतला आहे.

या मार्गावर नवी मुंबईतील तब्बल 11 स्थानके प्रस्तावित असणार आहेत. यामध्ये वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ सेक्टर 1, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, सागर संगम, तारघर/मोहा, NMIA पश्चिम आणि NMIA टर्मिनल 2 या स्थानकांचा समावेश असणार आहे.

Summery

  • नवी मुंबईसाठी आता आणखी एक मेट्रो धावणार

  • विमानतळासह 11 स्थानकांना मिळणार थेट जोडणी

  • शहराच्या अंतर्गत भागात ही मेट्रो धावणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com