Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation

Mumbai Municipal Corporation : मुंबई पालिकेच्या आरक्षणाची सोडत 'या' तारखेला काढण्यात येणार

आरक्षण निघाल्यानंतर जागा वाटप प्रक्रियेला वेग येणार
Published on

थोडक्यात

  • मुंबई पालिकेच्या आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबरला काढणार

  • आरक्षण निघाल्यानंतर जागा वाटप प्रक्रियेला वेग येणार

  • मुंबई पालिकेने जारी केली अधिसूचना

(Mumbai Municipal Corporation ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे. महानगरपालिकांची नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालाय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेच्या आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबरला काढण्यात येणार असून आरक्षण निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय पातळीवर जागा वाटप प्रक्रियेला वेग येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढली जाणार असून उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता मुंबई महापालिकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आधीचे आरक्षण विचारात न घेता नव्याने आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com