BMC Election : मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना
थोडक्यात
मुंबई महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे
प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना दाखल
6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याचे नियोजन
(BMC Election ) मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. मुंबई महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. या प्रभाग रचनेवर मुंबईत 410 हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत.
मुंबई महापालिकेने प्रभाग रचनेचे काम पार पाडले असून ही प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी मुंबईकरांकडून 22 ऑगस्ट ते 4सप्टेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर काल 4 सप्टेंबर रोजी महापालिकेकडे 410 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 ते 12 सप्टेंबर या वेळेत हरकती आणि सूचना यावर सुनावणी होणार असून महापालिकेचे माजी आयुक्त तथा सनदी अधिकारी इक्बाल सिंग चहल याबाबत सुनावणी घेणार आहेत. 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.