Mumbai Accident
मुंबई
Mumbai Accident : दादरमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू, चार प्रवासी जखमी
टेम्पो ट्रॅव्हलरची बेस्ट बसला धडक
थोडक्यात
दादरमध्ये भीषण अपघातात
टेम्पो ट्रॅव्हलरची बेस्ट बसला धडक
अपघातात एकाचा मृत्यू, चार प्रवासी जखमी
(Mumbai Accident ) मुंबईतील दादरमध्ये बेस्ट बस आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. बेस्ट बस स्टॉपवर येत असतानाच टेम्पो ट्रॅव्हलरची बसला धडक बसली आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात एकाचा मृत्यू तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. धडक लागून बेस्ट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडकली. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून अपघातात शहाबुद्दीन नावाच्या ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.
अपघातात एका टॅक्सी आणि कारच देखील नुकसान झालं असून टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.