Mumbai Bomb Threat : मुंबईत मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
थोडक्यात
मुंबईत मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या नावावरुन धमकीचा मेसेज
धमकी देणाऱ्याला नोएडामधून पोलिसांनी अटक केली
(Mumbai Bomb Threat) मुंबईत गणेशोत्सवाचे दिवस सुरू असताना अचानक आलेल्या बाँम्बच्या धमकीचा मेसेज आला होता. ज्यामध्ये 14 दहशतवादी शहरात शिरले असून 400 किलो RDX 34 वाहनांमध्ये लपवून ठेवले आहे, असा दावा करण्यात आला होता. ज्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं होते.
याच पार्श्वभूमीवर आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी बॉम्ब स्फोट होणार असा मेसेज करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आता धक्कादायक माहिती उघड झाल्याची माहिती मिळत आहे. त्या माणसाने मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या नावावरुन हा धमकीचा मेसेज केला होता.
अश्विन कुमार सुप्रा (50) असे मेसेजद्वारे धमकी देणाऱ्या इसमाचे नाव असून त्याला नोएडामधून पोलिसांनी अटक केली आहे. मित्राने खोटा खटला दाखल केल्याने तीन महिने तुरुंगात जावे लागले त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या नावाचा वापर करून मेसेज केले असल्याची त्या व्यक्तीने माहिती दिली आहे.