Mumbai : मुंबईत ड्रोन व फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
थोडक्यात
मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडवण्यास बंदी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास आणि विकण्यास बंदी
( Mumbai ) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन व फ्लाइंग कंदील उडविण्यास आणि विकण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास आणि विकण्यास बंदी घातली आहे.
यासोबतच फ्लाइंग कंदीलची विक्री करण्यासही परवानगी नसणार आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या दिवसांत फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी असणार असल्याची माहिती मिळत आहे.